ग्रामपंचायत खानिवली व आयडियल हॉस्पिटल पोशेरी यांच्या सयूंक्त विद्यमाने आज खानिवली ग्रा.पं. कार्यालय येथे आरोग्य शिबीर आयोजित केले होते
आज जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला सार्वजनिक सौचालयाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने गावातील नाका येथे आणि उर्दू शाळा येथे सार्वजनिक सौचालयाचे उदघाटन केले.नाक्यारील सौचालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते व उर्दू शाळा येथील सौचालयाचे उद्घाटन उपसरपंच मा.सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी गावातील ज्येष्ठ व जागरूक नागरिक मा.इस्माईल भाई,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजिद बुबेरे,तौहिद फक्की,शादाब काझी,मोतासीम कुरेशी,ग्रामपंचायत सदस्य रमेश डुकले,डॉ. राहुल भोईर,प्रेरणा पोटींदा,निकिता वाघ,सारिका पाटील,दीपक खुताडे,फिरदोस काझी,तुलसा पवार ग्रामसेवक मा.दीपक पाटील उपस्तीत होते.
आज भारतीय संविधान दिन,29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती तयार करण्यात आली.26 नोव्हेंबर1949 रोजी तो मसुदा संविधान सभेने स्वीकारला आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्याची प्रत्येक्ष अंमलबजावणी सुरू झाली.म्हणून 26 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.संविधान दिनाचे औचित्य साधून आज ग्रामपंचायत खानिवली येथे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ग्रामपंचायत खानिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली.
आज विठ्ठल रखुमाई मंदिर खानिवली येथे बायफ,टाटा मोटर्स आणि पंचायत समिती वाडा यांच्या सयूंक्त विद्यमाने बायफ चे प्रतिनिधी शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करण्याच्या उद्देशाने माहिती देण्यासाठी आले होते.या संधर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच ग्रामपंचायत स्थरावर सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली.यावेळी गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री.व्ही.जी.पाटील सर व गुरुनाथ पाटील सर तसेच गावातील ज्येष्ठ शेतकरी उपस्थित होते.
गावात फवारणी चालू आहे,,आपल्या ओपन गटारी किंवा शोषखड्डे फवारायचे बाकी असतील तर गोकुल मोहणे शी संपर्क करा.
1 मे महाराष्ट्र दिन ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात आला.
आज अल्पसंख्याक वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मस्जिद सभोवताली काँक्रीट रस्ता तसेच कब्रस्तानकडे जाणार रस्ता याचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी गावातली मुस्लिम बांधव उपस्थित होते.
आज ग्रामपंचायत खानिवली येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या वेळी गावामध्ये कार्यरत विविध शासकीय विभागांच्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी हायस्कुल ,मराठी शाळा शिक्षिका ,प्राथमिक आरोग्य केंद्र,पोस्ट ऑफिस,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर ई. कार्यरत महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.🙏
पहिले काम पूर्ण...उर्दु शाळा SBM TOILATE
वार्ड क्र.1 मधील विविध पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी उपसरपंच सागर पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.ए. डी. पाटील,राजेश पाटील,मधुकर पाटील व ग्रा.पं. सदस्य प्रेरणा पोटींदा, सारिका पाटील तसेच गावातील सर्व तरुण युवक हजर होते.
आज ग्रामपंचायत मार्फत 5% दिव्यांग निधी वितरीत करण्यात आला
आज गावातील अंगणवाडी केंद्र 1 चे उद्घाटन करण्यात आले.अतिशय सुंदर आणि चित्रे रेखाटलेली ही अंगणवाडी गावातील आदर्श अंगणवाडी आहे.या नंतर गावातील सर्व अंगणवाड्या या सुद्धा अश्याच सुंदर आणि डिजिटल बनवायच्या आहेत.
आज ग्रामपंचायत कार्यालय खानिवली येथे गावाच्या तंटामुक्ती समितीची बैठक पार पडली,यावेळी गावातील छोट्या छोट्या विषयावरून होणाऱ्या वादा संदर्भात चर्चा करून ते वाद गावातच तंटामुक्ती कमिटीच्या मार्फत मिटविण्याचे ठराव घेतले,शिवाय अनेक गावात शांततापूर्वक वातावरण कसे तयार होईल या बाबतीत विचार विनिमय केला.या सभेला खानिवली पोलिस बिट चे PSI तारगे साहेब हे सुद्धा उपस्थित होते.तंटामुक्ती ची पहिली सभा यशस्वी रित्या पार पडली.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री एकनाथ पाटील अण्णा ,पोलिस पाटील श्री.नितीन पाटील ,उपसरपंच सागर पाटील तसेच ज्येष्ठ सदस्य श्री. ए. डी. पाटील व सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी,भाईंदर येथे उपग्रह आपल्या हाती हे प्रशिक्षण यशस्वी पणे घेतले.उपग्रहाच्या मदतीने गावाचा विकास कसा होऊ शकतो,गावातील सर्व प्रकारची अद्ययावत माहिती कशी संकलित करू शकतो आणि त्या माहितीचा वापर करून गावाचा GPDP आराखडा बनवताना कशी मदत होऊ शकते,उपग्रहाच्या तंत्रज्ञानाने गावाचा शाश्वत विकास कसा करू शकतो ,या सारखी अंत्यत महत्त्वाची माहिती आणि प्रत्येक्ष डेटा संकनलाची ट्रेनिंग या प्रशिक्षण दरम्यान आम्हाला दिली.निश्चितच या ट्रेनिंग चा वापर करून गावाचा सर्वांगिण व शाश्वत विकास करण्यास मदत होणार आहे.माझा या ट्रेनिंग मधील सहभाग आणि अनुभव व कौशल्य बघून प्रबोधिनी मधील सर्व प्रशिक्षक माझ्यावर इम्प्रेस झाले.या ट्रेनिंग च्या माध्यमातून माझी दि.15 ते 18 ऑक्टोबर हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्पेस कॉन्स्फरन्स साठी निवड केली गेली.या कॉन्फरन्स मध्ये भारतातील व जगभरातील अनेक नामवंत व टॉप चे स्पेस,सॅटेलाइट इंडस्ट्री मधील लोकं उपस्थित राहणार आहेत.एका व्यक्तीला 60 हजार च्या वर खर्च येतो त्या कॉन्फरन्स साठी मला फ्री एन्ट्री व इस्रो सारख्या जगप्रसिद्ध स्पेस सेंटर मध्ये राहायची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामपंचायत खानिवली 15 ऑगस्ट सोहळयाचे ड्रोन कॅमेऱ्याने केलेले अप्रतिम चित्रीकरण.अवश्य पहा
आज खानिवली ग्रामपंचायत ची ग्रामसभा आयोजित केली होती.ग्रामसभेला लोकांचा निरुत्साह असतो हे लक्षात घेऊन सकाळी गावामध्ये मी स्वतः ग्रामसभेचा अजेंडा वाटप केला त्याचा परिणाम खुप चांगला झाला.लोकांचा खुप चांगला प्रतिसाद ग्रामसभेला मिळाला आणि ग्रामसभा यशस्वी रित्या पार पडली.
मेरा गाँव बदल रहा है
आज ग्रामपंचायत खानिवली मार्फ़त वार्ड क्र 1. मध्ये महिलांचे हीमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी महिलांचे आभा कार्ड सुद्धा काढण्यात आले या पुढील शिबिर वार्ड क्र .2 मध्ये असणार आहे
माझी वसुंधरा 4.0अंतर्गत वातावरणीय बदल(climate change ) जनजागृति कार्यक्रम आज आ.चंदावरकर विद्यालयात आयोजित केला होता.यावेळी सदर विषयवार श्री यादव सर यांनी व्याख्यान दिले.यावेळी उपसरपंच श्री.सागर पाटील,सदस्या प्रेरणा पोटिंदा,सारिका पाटील,निकिता वाघ,शाळेच्या मुख्याधिपिका पाटील मॅडम,श्री R.B.पाटील सर ,गांगुर्डे सर,कामड़ी सर,सुशांत पाटील सर उपस्तित होते.
आज ग्रामपंचायत खानिवली येथे माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत तरुणांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली.तसेच सामुहिक ई प्लेज घेण्यात आली.तसेच आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
आज विट्ठल रखुमाई मंदीर खानिवली येथे गावातील गणपती स्थापना व् विसर्जन याचे नियोजन करण्याबाबत सभा आयोजित केली होती यावेळी मा.रामदास पाटील सर यांनी उपस्तित नागरिकांना गणपतीची स्थापना ,पूजा अर्चा व् विसर्जन या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच अनेक विषयवार चर्चा विनिमय होऊन एक समान कार्यक्रम निच्छित केला.तसचे मी माझी वसुंधरा 4.0अभियान अंतर्गत आज सण ऊत्सवांच्या वेळी होणारे जलप्रदूषण व् पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर या संदर्भात जनजागृती पर आवाहन केले .या उपक्रमामध्ये गणपती विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले तसेच निर्माल्य गोळा करण्याबाबत माहिती दिली.गोळा केलेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्याबाबत उपस्तित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच नदीवर विसर्जन स्थळी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे.त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले.प्लास्टर ऑफ़ पॅरिस च्या मूर्तिमुळे जलप्रदूषण होते याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी ग्रा.पं सदस्या सारिका पाटील,मंदीर कमिटीचे अध्यक्ष श्री.ए.डी.पाटील,पोलिस पाटील श्री नितिन पाटील ,सचिव मधुकर तात्या,श्री गुरुनाथ पाटील सर,सचिन पाटील,विकास पाटील,भावेश पाटील व् गावातील पर्यावरण दूत व् ज्येष्ठ नागरिक उपस्तित होते.श्री.व्ही.जी.पाटील सर यांनी उपस्तित नागरिकांचे आभार मानले.
मेरा गाँव बदल रहा है
आज ग्रामपंचायत खानिवली माझी वसुंधरा 4.0 अभियानांतर्गत सण ऊत्सवांच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक कृत्रिम तलवाची निर्मिति केली होती.या वेळी गावातील गणेश भक्तांना आवाहन केले होते की आपला गणपती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करावा,ग्रामपंचायत च्या या आवाहनाला गावकऱ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.तसेच गणपतीच्या मुर्तीसोबत जे निर्माल्य आणले जाते ते नदीमध्ये टाकल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते त्यामुळे ते निर्माल्य संकलित करण्यासाठी गणेश घाटावर ड्रम ठेवले होते.सर्व निर्माल्य ड्रम मध्ये संकलित केल्यामुळे नदीचे होणारे प्रदुषण रोखले गेले.मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न गरजेचे असतात आणि आज आमच्या कडून हे प्रयत्न केले गेले आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला.संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावली ती पर्यावरण दुतानी.गावातील कॉलेज ला जाणारी मुलांची पर्यावरण दूत म्हणून निवड केली आहे.या दूतांची अनेक सार्वजनिक उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीला मदत होत आहे.मिरवणुकीमध्ये ट्रॅफिक चे नियोजन करणे,विसर्जन स्थळी निर्माल्य गोळा करुण ते ड्रम मध्ये टाकणे,गणपती विसर्जन करण्यासाठी मदत करणे हे सर्व काम पर्यावरण दूत अगदी कळकळीने निभावत होते.ग्रामपंचायतीचे हेल्पिंग हैंड म्हणून आज या पर्यावरण दूतानकड़े बघितला जात आहे.अश्या पध्दतीने आज ग्रामपंचायतीने पर्यावरणाला घातक असलेली परंपरा बदलण्याच्या दृष्टीने आज पहिले पाउल टाकले आहे.त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार
मेरा गाँव बदल रहा है.मेरे गाँव के लोग बदल रहे है.ज्या गावामध्ये एक ही ग्रामसभा होत नव्हती,त्या गावामध्ये आता सर्व ग्रामसभा पूर्ण यशस्वी पणे पार पडत आहेत.आणि विशेष म्हणजे गरीब लोक,महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.ह्याच महिला गावाची ताकत बनत आहेत. #आमची खानिवली#
आज ग्रामपंचायत खानिवली चा अभ्यास दौरा शिरसाटे व मोडाले ता.ईगतपुरी जि.नाशिक येथे आयोजित केला होता.शिरसाटे ग्रामपंचायत ही राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये राज्यात प्रथम आली आहे.तेथील ग्रामसेवक श्री.हनुमंत दराड़े भाऊसाहेब यांनी खुप चांगली माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले.
आज ग्रामपंचायत खानिवली येथे जागतिक ई कचरा संकलन दिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थी,पर्यावरण दुत,गावातील तरुण ,शाळेचे शिक्षक उपस्थित होते.यावेळी घरातून निघणाऱ्या ई कचरा म्हणजे नादुरूस्त मोबाईल,ख़राब झालेला चार्जर ,पीना असा कचरा ग्रामपंचायत मार्फ़त संकलित केला.व् उपस्थित लोकांना व् विर्द्यार्थ्यांना ई कचऱ्याबाबत मार्गदर्शन केले व् जनजागृती केली.
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत आकाश तत्वावर आधारित आ.लं.चंदावरकर विद्यालय खानिवली येथे विद्यार्थी व् शिक्षकांना सोबत घेऊन ई प्लेज घेण्यात आली.
आज ग्रामपंचायत खानिवली च्या वतीने कार्यकारिणीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने गावातील शासकीय सेवा निवृत्त व्यक्तींचा सत्कार आयोजित केला होता.या वेळी गावातील ज्येष्ठ सेवा निवृत्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.तसेच एक वर्षाच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांचा लेखाजोखा उपस्थित नागरिकांसमोर मांडण्यात आला.
आज माझी वसुंधरा अभियान 4.0 ग्रामपंचायत खानिवली अंतर्गत जागतिक मृदा दिनाचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त गावातील शेतकऱ्यांना कृषी कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे व त्यापासून सेंद्रिय खत कसे तयार करायचे तसेच जंतु नाशक व रासायनिक खतांचा कमी वापर ,सेंद्रिय शेती,ठिबक सिंचन ,बॉयोगैस बद्दल माहिती देण्यात आली.यावेळी गावातील शेतकरी,तालुका कृषी पर्यवेक्षक व मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान 4.0 घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याच्यापासून खत तयार करणे बाबत आज खानिवली ग्रामपंचायत मध्ये ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आजपासून सुरुवात करण्यात आली.अश्या प्रकारे सेंद्रिय खत तयार करणारी खानिवली ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. #majhivasundhara #MissionLiFE #पृथ्वी
खानिवली ग्रामपंचायतीला ISO 9001:2015 मानांकन मिळाले आहे.त्या बाबतीत प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित केला होता.सदर सोहळ्यास मा.अस्मिता ताई लहांगे सभापती पंचायत समिती वाडा तसेच गटविकास अधिकारी मा.राजेंद्र खताळ साहेब,उपसरपंच सागर पाटील,सदस्य सौ.प्रेरणा पोटिंदा ,सारिका पाटील,फिरदोस काझी ,खानिवली मंडळ अधिकारी श्री.भोईर भाऊसाहेब ,खानिवली तलाठी श्री.डोकफोडे तात्या,गावचे पोलिस पाटील श्री.नितिन पाटील,टंटामुक्ती अध्यक्ष श्री.एकनाथ पाटील श्री.राम पाटील सर तसेच गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व तरुण युवक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
आज राज्याचे प्रधान सचिव(रोहयो)मा.दिनेश माघमारे साहेब यांनी ग्रा.पं.खानिवली येथे भेट दिली.भेटी दरम्यान गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.तसेच अमृत सरोवर व गांडूळ खत निर्मिति बाबत माहिती घेतली.खानिवली ग्रामपंचायत ही तालुक्यातील नंदा दिप ग्राम म्हणून निवडण्यात आली आहे.ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शोषखड़यांचे काम चालू असून घरोघरी शोषखड्डे तयार करण्याचे काम सुरु आहे.तसेच वैयक्तिक सिंचन विहिर,गायगोठे,शेळी पालन शेड,नाडेप कंपोस्ट,पेव्हर ब्लॉक रस्ते,सिमेंट कॉंक्रीट रस्ते तयार केले आहेत तसेच तयार करण्याचे काम सुरु आहे.रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे.या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी स्वतः राज्याचे रोजगार हमी योजनेचे सचिव मा.दिनेश वाघमारे साहेब,विजयकुमार कलवले साहेब,सहाय्यक संचालक रोहयो,यांनी भेट दिली.यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ साहेब,त्यांच्या सोबत प्रमोद पाटील,APO तसेच विजय भोईर,अभियंता योहयो,सरपंच श्री.भरत हजारे ,सदस्य सारिका पाटील,निकिता वाघ ग्रामसेवक श्री.पंकज चौधरी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचातीच्या इलेक्ट्रिक घंटा गाडीचे उद्घाटन मा.दिनेश वाघमारे साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
🌎 माझी वसुंधरा अभियान 🌎 भूमी तत्व : 1.1.2 : जिओ-टेगिंगसह वृक्षगणना,तयारी व प्रकाशन वृक्षगणना हे वृक्ष आच्छादन आणि प्रजातींच्या विविधतेबद्दल माहिती देणारे एक महत्वाचे शास्त्रीय आणि तांत्रिक साधन आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेतील हरित आच्छादनाचे सरंक्षण आणि संवर्धन कसे करावे या बद्दल अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यासाठी ह एक धोरणात्मक साधन म्हणून काम करते.या निर्देशकानुसार उद्दिष्ट ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी,त्यांच्या क्षेत्रातील हरित आच्छादनाचे जतन आणि सरंक्षण करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रयत्नांचे मूल्यमापन करने हे आहे. ग्रामपंचायत खानिवली ने ग्रामपंचायत हद्दीतील वृक्षगनणा केली असून गावातील प्राचीन वृक्ष संवर्धन आणि जतन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. #MajhiVasundharaAbhiyan4 #MissionLiFE #भूमी
RTC यशदा पुणे येथे OSR (Own Source Revenue) या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले
पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आपण ग्रामपंचायत मध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहोत.सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या उपक्रमामध्ये भाग घ्यावा व पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करावा